pub-7425537887339079
ब्रेकिंग

31 मे या दिवशी तीन मुख्याध्यापक सेवानिवृत्त, जाफराबादेत मुख्याध्यापकांचा सत्कार; रिक्त जागा भरण्याची पालकांची मागणी

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3

जाफराबाद तालुक्यातील तीन मुख्याध्यापक ३१ मे रोजी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. यात जाफराबाद येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शिवहरी ढाकणे, बुटखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास तळेकर व बोरगाव फदाट येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत देशमुख यांचा समावेश आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “जाफराबाद तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी दिलेले प्रेम आणि सहकार्य आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही,” अशा भावना सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. दरम्यान, तालुक्यात दरमहा अनेक शिक्षक व मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत असल्याने अनेक जागा रिक्त होत आहेत. या रिक्त जागा तातडीने न भरल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे