कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने आयोजित सायबर सेक्युरिटी व सामाजिक सुरक्षा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले या कार्यशाळेत भागुबाई चांगु ठाकूर लॉ कॉलेज पनवेलचे विद्यार्थी राहुल भालेकर, गणेश पंडित, आयुष्य तिवारी व काशिनाथ शिंगवा हे उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी विद्यार्थ्यांनी सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करावा व मोबाईलचा वापर योग्य ठिकाणी व गरज असतानाच करावा असे सांगितले. कार्यक्रमात राहुल भालेकर यांनी ऑनलाइन फिशिंग विषयी सविस्तर माहिती दिली. तर गणेश पंडित, आयुष तिवारी व काशिनाथ शिंगवा यांनी ऑनलाइन हॅकिंग, सोशल मीडिया, फोटो मार्फिन, कस्टमर फेक कॉल, बँक फेक कॉल व विविध फेक लिंक्स या संबंधात माहिती देऊन जागृती केली. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना अतिशय दक्षपणे व्यवहार करावा व आपली सुरक्षा व आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, प्राध्यापक डॉ. ए.के. गायकवाड, प्राध्यापक डॉ.एच. के. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन एस एस विद्यार्थी धनाजी नाईक यांनी मानले . कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.