pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद आगार, आता स्मार्ट होणार, प्रदूषणमुक्त आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा; लवकरच होणार लोकार्पण, चार वातानुकूलित बस डेपो मध्ये दाखल

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6

जाफराबाद बस आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी चार नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) दाखल झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आगारात ई-बसेससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होते. हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर आता या बसेस आगारात उपलब्ध झाल्या असून, जाफराबाद आगाराने पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इंधन बचत आणि आरामदायी प्रवास डिझेलवरील एसटी बसेसला ई-बसेस हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. या बसेसमुळे महामंडळाच्या जाफराबाद आगारात नव्याने दाखल झालेल्या ई-बसेस आणि पाठीमागे उभारण्यात आलेले चार्जिंग स्टेशन. इंधनावरील खर्चात मोठी बचत होईल, तसेच प्रवाशांना वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभमिळेल, अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. ई-बसेस पूर्णपणे आवाजविरहित असल्याने आणि त्यामध्ये आरामदायी आसनव्यवस्था असल्याने नियमित प्रवास करणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या नव्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे. या नवीन ई-बसेसचे रीतसर उद्घाटन लवकरच पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या हसते    ——————————————————————-

प्रवाशांमध्ये उत्साह रोज जालन्याला ये-जा करणारा विद्यार्थी अक्षय पवार याने सांगितले की, उन्हाळ्यात लाल डब्यात घामाच्या नद्या वाहायच्या. आता ई-बसच्या एसीत बसून शिमला फिरल्यासारखे वाटेल. इतर महाराष्ट्रातील बस स्थानकांमधून वातानुकूलित मी बसेस धावतात तशाच जाफराबाद आगारातून वातानुकूलित ही बसेस धावणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, सदर बसला टेंभुर्णी बस स्थानकाला थांबा द्यावा ही प्रवाशांकडून मागणी होत आहे.

प्रवासी विश्वनाथ सखाराम सांगळे

जाफराबाद झाले स्मार्ट बैलगाडीपासून एसटीच्या लाल डब्यापर्यंतचा प्रवास पाहिलेल्या जाफराबादने आता थेट इलेक्ट्रिक युगात उडी घेतली आहे. चार्जिंग पॉईंटचे निळे खांब आता आगाराची नवी ओळख बनले आहे. उद्घाटनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बसेस प्रामुख्याने जाफराबाद-जालना आणि जाफराबाद-छत्रपती संभाजीनगर या मागाँवर प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. या सुविधेमुळे आता ग्रामीण भागातील प्रवाशांना अत्याधुनिक बस

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे