pub-7425537887339079
ब्रेकिंग

महिला भक्तगणांच्या पुढाकाराने, संगीतमय भागवत कथा प्रारंभ

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28

टेंभुर्णी येथील मध्य वस्तीत स्थित असलेल्या श्री संत सावता माळी मंगल कार्यालयाच्या परिसरात आज पासून श्रीमद भागवत कथा सोहळ्यास आज दिनांक 29 मे शुक्रवार पासून प्रारंभ होणार आहे. हा श्रीमद भागवत कथा सोहळा दिनांक 4 जून 2026 पर्यंत चालणार आहे. सालाबादप्रमाणे तसेच अधिक मास निमित्त या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.टेंभुर्णी येथील श्री महालक्ष्मी महिला भागवत सेवा समितीच्या वतीने या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक 29 मे रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर जाफ्राबाद तालुक्यातील गोपी सोनगिरी येथील गोपेश्वर आश्रमाचे मठाधिपती राघव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. या श्रीमद् भागवत कथेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी महिला सेवा समितीच्या कुसुमबाई पंडित ,वंदना डोईफोडे, कांताबाई भोपळे ,मंडाबाई डोमळे ,कल्पना डोईफोडे, कुंता गीते ,सुमनबाई टिकटे, सुनिताबाई बेंद्रे, प्रतिभा डोमळे ,मुक्ता नवले ,शोभा भुतेकर, गुंड मॅडम आदींनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे