प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाच्या नियोजनासाठी मराठा सेवा संघ कार्यालयात १५ मे रोजी समविचारी संघटनांची बैठक

जालना/प्रतिनिधी,दि.12
बुवाबाजी विरोधी अभियानांतर्गत जालना शहरात प्रख्यात बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान शनिवार, २३ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. “बुवा तेथे बाया” तसेच “खरात सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात?” या अत्यंत संवेदनशील व समाजप्रबोधनात्मक विषयांवर प्रा. श्याम मानव मार्गदर्शन करणार आहेत. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि महिलांची फसवणूक यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे हे व्याख्यान समाजजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर विविध समविचारी संघटना, कार्यकर्ते व नागरिकांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार असून इच्छुकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता भाग्यनगर येथील मराठा सेवा संघ कार्यालयात होणार आहे. बैठकीस सर्व समविचारी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जालना शाखेचे जिल्हा संघटक सुनिल ज. वाघ, जिल्हाध्यक्ष मोहन राठोड व कार्याध्यक्ष काकासाहेब खरात यांनी केले आहे.



