उरणमधील डाऊर नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होत्या.
डॉ. मोहम्मद आमिर शेख सध्या पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेतली जात असून, पीएच.डी. पदवी संपादन करणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.
उरण, रायगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. उरण परिसरातील एका तरुणाने अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या यशामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.
या यशाबद्दल डॉ. आमिर शेख यांनी आपले वडील रियाज अहमद, माजी उपप्राचार्य (निवृत्त), आई श्रीमती निशात बानो, पत्नी जैनब खातून, भगिनी, मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
डॉ. मोहम्मद आमिर शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल उरण, रायगड परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा (दक्षिण रायगड) उत्साहात संपन्न
13 hours ago
राजुरा ता. मुखेड येथे दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा परिसरातील दिव्यांगाची बैठक संपन्न
14 hours ago
हडपसर येथे संत शिरोमणी नरहरी महाराजांचा ८३३ वा जन्मोत्सव उत्साहात संपन्न
22 hours ago
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता; हाता-तोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती
2 days ago
जालना गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची शिक्षक कृती समितीची मागणी
2 days ago
टेंभुर्णी येथे २२ वर्षीय तरुण दुर्गेश बनकरची गळफास घेऊन आत्महत्या; बनकर कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर,परिसरात हळहळ
2 days ago
महावितरणच्या वीज तार, पाण्याच्या मोटारी व सोलार वायर चोरी करणारी टोळी जेरबंद
3 days ago
नांदेड जिल्हाधिकारी दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे का कार्यवाही झाली नाही याचे पंधरा दिवसात लेखी ऊतर द्या नाही तर स्व ईच्छारण्याची परवानगी साठी जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलनाचा ईशारा चंपतराव डाकोरे पाटील