pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना पब्लिक स्कूलमध्ये “पदवीदान समारंभ” उत्साहात संपन्न!

लहान लहान पावलांची एक नवी भरारी, , स्वप्नांच्या आकाशकडे पहिले पाऊल.

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

टेभुर्णी/दत्ता देशमुख,दि.30

जालना पब्लिक स्कूल मध्ये पदवीदान समारंभ 2025 -26 मोठ्या उत्साहात साजरा केला आणि युकेजी च्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिलीत नाटक, नृत्य आणि सत्कार समारंभाच्या दरम्यान भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पालकांनी शाळेची शिस्त, संघटित कामकाज,उत्कृष्ट व्यवस्था तसेच सौहार्दपूर्ण व उच्च शैक्षणिक वातावरण याबाबत आपल्या मनोगता मधून समाधान व्यक्त केले. यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना पारितोषिक , गुणपत्रक ,बक्षिसे गौरविण्यात आले.कार्यक्रमामध्ये पालकांनी आणि विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला,पालकांचे व विद्यार्थ्यांचे विविध खेळही घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या श्रीमती कीर्ती पवार यांनी भूषविले.प्रास्ताविक व संयोजन दीपाली हजारे यांनी तर आभार प्रदर्शन नेहा राठोड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता काळे,ऋतुजा हिवाळे, प्रार्थना शेटे,अश्विनी हिवराळे,सुषमा सोनवणे,आरती नागरे, रेणुका क्षीरसागर तसेच सेविका भाग्यश्री दवे,जिजाबाई खैरे यांनी परिश्रम
घेतले.शाळेची उत्कृष्ट व्यवस्था दर्जेदार शिक्षण आणि संस्कृत वातावरणामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे