ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या आंबेगाव येथे मासिक चर्चासत्र संपन्न _दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी धीर धरण्याचा सुर

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथे ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शुक्रवार ( दि. ९ ऑक्टोबर ) रोजी पार पडले.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये सातत्याने संवाद, ज्ञानविनिमय आणि सामूहिक शेतीची चळवळ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. नियमित चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग, बाजारपेठ, शेतीतील संधी आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याबाबत मार्गदर्शन मिळत असले तरी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे यावेळी सर्वांच्याच चर्चेतून पुढे आले.
या वेळी झालेल्या शिवारफेरी व चर्चासत्र कार्यक्रमास ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील, भानुदासराव डोईफोडे, सुधीर जोशी, नंदकिशोर देशमुख, ज्ञानदेव पाटील गाडेकर, दत्तात्रय देठे, पंढरीनाथ देठे, चंद्रकांत देठे, शुभम देठे, परमेश्वर देठे, रुस्तम देठे, ऋषिनाथ देठे, कारभारी देठे, अंश शिंदे यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले होते.
श्री. दत्तात्रय देठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वनभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


