निवडणुकीवर बहिष्कारामुळे, नगरपंचायत च्या प्रस्तावाला गती, प्रस्ताव त्रुटींच्या पूर्ततेसाठीं परत अडचण आणल्यास आंदोलनाच्या पावित्र्यात जनता

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15
टेंभुर्णी: ‘टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा, अन्यथा आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकू,’ अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानंतर प्रशासनाची हालचाल सुरू झाली आहे. गेल्या एक वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या नगरपंचायतीच्या प्रस्तावाला आता गती मिळाली असून, प्रस्तावातील ९ त्रुटींची पूर्तता करून तो पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे यासाठी ग्रामस्थ मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत. यासाठी मुख्यमंत्री ते गटविकास अधिकारी स्तरापर्यंत निवेदने देण्यात आली होती. जुलै २०२५ मध्ये ग्रामपंचायतीमार्फत नगरपंचायतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. १२ जून २०२६ रोजी प्रभाग आरक्षणासाठी आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. यावेळी जाफराबाद तहसीलदारांनी मध्यस्थी करून ग्रामपंचायतीला मिळणारा निधी पडतोय अपुरा ‘टेंभुर्णी गावाची लोकसंख्या आणि व्याप्ती वाढली असून ग्रामपंचायत स्तरावर मिळणारा निधी अपुरा पडत आहे. नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठवून एक वर्ष उलटल्यानंतर प्रशासनाने हालचाल करणे आश्चर्यकारक आहे. त्रुटी पूर्ततेसाठी पुन्हा विलंब होऊ नये,’ अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते जनार्धन झोरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, टेंभुर्णी ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपल्याने सध्या कारभार प्रशासकाकडे आहे. आगामी निवडणुकीपूर्वी नगरपंचायतीचा निर्णय व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे १२ जूनला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय. ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ६ जुलै रोजी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तो गटविकास अधिकाऱ्यांकडे परत पाठविला. प्रस्तावात तहसीलदारांचे लोकसंख्या व घनतेचे प्रमाणपत्र, अकृषिक रोजगाराची टक्केवारी, ग्रामपंचायतीच्या कालावधीचे प्रमाणपत्र, भौगोलिक क्षेत्र, चतुःसीमा नकाशा यासह एकूण ९ त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. दरम्यान, अनेक वर्षांपासून टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपातंर करावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.



