pub-7425537887339079
ब्रेकिंग

महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख, यांनी घालून दिला आदर्श, कुंकू टिळ्याच्या कार्यक्रमातच नातवाचे लावले लग्न

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 16

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख यांनी एक समाजासाठी आदर्श घालून दिला आहे. आपल्या नातवाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातच कुंकू टिळा करण्याचे ठरले. परंतु देवराव देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन टेंभुर्णी येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉक्टर अविनाश सुरवसे, अंकुशराव देशमुख,प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, कैलास देशमुख, राजू देशमुख, भाऊसाहेब देशमुख, भास्कर देशमुख,यांच्या पुढाकाराने व समाज बांधवांच्या आग्राहा खातर यातच विवाह संपन्न करावा असा आग्रह धरला. मुलीकडील मदने परिवाराने यांनी त्यास होकार दिला व दोन्ही परिवारात च्या संमती नंतर दिनकर देवराव देशमुख यांचा मुलगा पवन दिनकर देशमुख यांचा आदर्श शुभविवाह संपन्न झाला. या आदर्श विवाहाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून देशमुख परिवारासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे