विवाहाचा नवा पांडा घालून दिल्याबद्दल, आदर्श निर्माण केल्याबद्दल, देवराव देशमुख यांचा ग्रामपंचायत सदस्यांतर्फे सत्कार

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.18
टेंभुर्णी येथील महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, दत्त संस्थानचे अध्यक्ष, महेश पतसंस्थेचे उपाध्यक्ष, देवराव देशमुख, यांनी आपल्या नातवाचा आदर्श विवाह करून एक चांगला सामाजिक पायंडा पाडल्याबद्दल, व कृतीतून आदर्श निर्माण केल्याबद्दल, टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते, संजय गांधी निराधार योजनेचे जाफराबाद तालुका कमिटीचे सदस्य, भिकन भाई पठाण, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सदस्य प्राध्यापक रवींद्र उखर्डे, सामाजिक कार्यकर्ते सादिक भाई, यांनी देवराव देशमुख, मुलाचे वडील दिनकर देशमुख, यांचा सहृदय सत्कार केला. तसेच त्यांचे विशेष अभिनंदनही केले. समाजाला अशा कार्याची गरज आहे असेही त्यांनी याप्रसंगी उद्गार काढले. यावेळेस वेध रायगडाचे प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष दत्ता देशमुख हे उपस्थित होते, भास्कर देशमुख यांची उपस्थिती होती.



