pub-7425537887339079
ब्रेकिंग

कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयचे घवघवीत यश!

0 4 1 5 3 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/दत्ता देशमुख,दि.17

जालना येथील कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १०० शिक्षक क्लब जालना तर्फे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय व रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून सात ट्रॉफी संपादन केल्या.या बक्षिसाचे वितरण जालना जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी गिरीश पुजारी तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याते श्री मान्टे सर तसेच सामाजिक चळवळीचे राजकुमार बुलबुले,समाजसेवक दत्तात्रय देशमुख, शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष राजेभाऊ मगर, जि. प. प्रशाला मुलांची येथील मुख्याध्यापक डॉ. शिवनंदा मेहत्रे, जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष पारे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यामध्ये कु.समृद्धी घायाळ कु.अदिती राय, कु. भक्ती लाड, कु. वैष्णवी पाथरकर , कु. बीना इंगळे,.कु. ज्ञानेश्वरी सस्ते, आरव घायाळ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. उपक्रमशील शिक्षक संदीप इंगोले यांनी हा आपल्या शाळेमध्ये सामाजिक उपक्रम राबविला आहे. जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी अशा पद्धतीचा हा उत्कृष्ट असा उपक्रम शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे बनविण्यात आला आहे. समाजामध्ये एक आदर्श निर्माण होण्याचे हे एक लक्षण आहे. ह्या यशासाठी हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजीव देशपांडे,उपाध्यक्ष जगदीश बडवे,सचिव चंद्रशेखर वाघमारे, संचालक कुमारजी देशपांडे, नितीन कोळेश्वर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 3 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे