pub-7425537887339079
ब्रेकिंग

गाडेगव्हाणच्या विद्यार्थिनींशी लोकप्रतिनिधींचा मनमोकळा संवाद; शैक्षणिक समस्या सोडवण्याचे आश्वासन

0 4 8 4 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

टेंभुर्णी जवळील गाडेगव्हाण येथे मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान शालेय विद्यार्थिनींनी लोकप्रतिनिधींची उत्स्फूर्तपणे भेट घेऊन मनमोकळा संवाद साधला. चिमुकल्या विद्यार्थिनींच्या निरागस हास्यातून आणि आत्मविश्वासातून लोकसेवेची नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गाडेगव्हाण येथे भेट दरम्यान विद्यार्थिनींनी कोणताही संकोच न बाळगता स्वतःहून पुढाकार घेत आपल्या शैक्षणिक गरजा, शाळेतील सोयी-सुविधांअभावी होणाऱ्या अडचणी आणि दैनंदिन जीवनातील समस्या मांडल्या. लोकप्रतिनिधींनी अत्यंत आपुलकीने त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठाम आश्वासन दिले.
‘शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी’
“शिक्षणाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याला योग्य दिशा देता येते. मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण, योग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व लेकींनी मनापासून अभ्यास करून आपल्या स्वप्नांना गवसणी घालावी आणि आयुष्यात मोठे यश संपादन करावे,” अशा शब्दात लोकप्रतिनिधींनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि मोठी स्वप्ने पाहणारा आत्मविश्वास उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे