pub-7425537887339079
ब्रेकिंग

अंबड पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी

0 5 1 4 5 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 3

अंबड पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ यांच्यावर टँकर माफिया कडून झालेल्या प्राणघातक हाल्ल्याचा जाहीर निषेध जाफराबाद तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. अंबड पंचायत समिती कार्यालयामध्ये कनिष्ठ सहाय्यक प्रमोद वाघ हे नियमित काम करत असताना त्या ठिकाणी टँकर माफिया लहामगे यांनी त्यांच्याशी हूज्जत घातली त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्याला जबर मारहाण लागली असून सध्या त्यांची प्रकृती नाजूक आहे. संबंधित पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व संघटना या प्राणाघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता. गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. ही गंभीर बाबअसून त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी म्हणून लेखणी बंद व काम बंद आंदोलन करण्यात आले. संबंधिताविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले म्हटलेले आहे. असे निवेदन कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकार सर्व कर्मचाऱ्यांच्या सह्या असून विकास अधिकारी बारगजे यांनी तात्काळ कार्य वाही करण्याचे निवेदनात विनंती करण्यात आली आहे. निवेदन देताना सर्व कर्मचारी हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 4 5 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे