समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा जागर काळाची गरज’….. – डॉ. राहुलजी म्हस्के
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७७ वा.संविधान गौरव दिन उत्साहात साजरा.....

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा जागर होणे ही काळाची गरज आहे’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव मा.डॉ. राहुलजी म्हस्के हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली गेली, परंतु समितीतील इतर सदस्यांनी वैद्यकीय कारणामुळे, परदेशात , वास्तव्य असल्यामुळे अंग काढून घेतले, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ताब्येतीची तमा न बाळगता दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार करून २६नोव्हेंबर १९४९रोजी मंजुरी साठी सादर केला व २६जानेवारी १९५०पासून संबंध भारतात भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन प्रजासत्ताक गणराज्यास सुरवात झाली असल्याचे सांगितले. समाजातील एकोपा, संवैधानिक मूल्ये आणि बंधुता टिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. सतीश जाधव साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कायदा व सुव्यवस्था, सामाजिक जबाबदारी, सुरक्षितता आणि समता-बंधुतेचे महत्त्व याबाबत सविस्तर विचार मांडले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ श्याम सर्जे , उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रो.डॉ.संतोष पहारे यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून घेतले. यावेळी मान्यवरच्या हस्ते उपस्थितांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समिती आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि मूल्य शिक्षण समितीने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सरिता मणियार यांनी केले तर आभार डॉ.सारिका जाधव यांनी मानले
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



