pub-7425537887339079
ब्रेकिंग

खानापूर येथे शिक्षण परिषद; एआय तंत्रज्ञानासह विविध विषयांवर संवाद

0 5 0 6 1 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

समाज सहभागामुळे शिक्षण  सर्वांगीण बनते. त्यामुळे शाळा विकासात समाजाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आळंद जि.प. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर गोफणे यांनी केले. कुंभारझरी केंद्राची शिक्षण परिषद शुक्रवारी जि.प. प्रा. शा. खानापूर येथे झाली. यावेळी ते ‘शाळा विकासात समाज सहभाग’ यावर बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख सुधाकरसिंह चिंधोटे यांनी प्रास्ताविकातून विविध

विषयांचा आढावा घेतला. तंत्रस्नेही शिक्षक धनंजय मुळे यांनी एआय तंत्रज्ञानाची शिक्षणातील भूमिका प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. आशयाच्या आधारे पाठाचे मासिक नियोजन या विषयावर शिक्षिका सुनीता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे गटकार्य घेऊन निवडक गटांनी सादरीकरण केले. मूल्यवर्धन विषयांतर्गत डॉ. जयंत नारळीकर विज्ञान गणित समृद्धी कार्यक्रमाची माहिती शिक्षिका मंजुषा बकतकार यांनी दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी खानापूर शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण गीते, शिक्षिका शारदा कायंदे व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 6 1 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे