pub-7425537887339079
ब्रेकिंग

नांदेड सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने संतप्त दिव्यांगानी विधीमंडळ अंदाज समितीला घेरावा, धरने आंदोलन

विधीमंडळ अंदाज समिती चले जाव चले जाव दिव्यांग सचिव मुंडेंची बदली रध्द करा अशा घोषणेने परिसर दणाणला

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ प्रतिनिधी,दि.9

सकल दिव्यांग संघटना,दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति संघटनेच्या संयुक्त पणे नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे यावेळी नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही संताप दिव्यांगानी घेराव घालून जॉब विचारला मान दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती त्याने राज्यातील बोगस दिव्यांगाना शोधून त्यांना योजनेतून बाद केले होते तसेच बोगस दिव्यांगशाळा आणि चुकीच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात आली. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली का केली? जॉब विचारण्यात आला आम्हाला गुंडगिरी नको तर आम्हाला मुंडे सारखा अधिकारी हवा, चले जाव चले जाव विधीमंडळ अंदाज समिती चले जाव ,आम्ही सारे तुकाराम मुंडे, मुंडे साहेबाची बदली रद्द करा अशा घोषणेने परिसरत कांहि काळ तणाव निर्माण झाला होता आणि जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये अंदाज समितीची बैठक चालू असताना संतप्त दिव्यांगानी घेरावा घालण्यासाठी जात असताना पोलीस यंत्राचा वापर करण्यात आला आणि दिव्यांग कार्यकर्ते पोलिसांमध्ये झटापट पण झाली पण पोलीस खात्याने चोख बंदोबस्त ठेवलेला होता तरीपण दिव्यांगानी जिल्हा नियोजन विभागाच्या तिन्ही गेटच्या पायऱ्यावर घोषणा करीत बराच काळ धरने केले दिव्यांग बांधव संतप्त झाले होते. त्यावेळी पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष मा.अर्जुन रावजी खोतकर हेमंत पाटील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब आंदोलनात स्थळी येऊन आंदोलन स्थळी भेट घेऊन निवेदन स्वीकारले चर्चा करून मुंडे साहेबांची बदली रद्द करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री सोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले असता दिव्यांगानी आताच मुख्यमंत्री साहेबांशी बोला असे म्हणतात खोतकर साहेबांनी मा. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता पण संवाद होऊ शकला नाही.
दिलेल्या निवेदनावर सखोल चौकशी करून दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व मा.राहुल साळवे,मा.चंपतराव डाकोरे पाटील यांनी केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठीमा.सुधाकरराव पिलगुंडे, आदित्य पाटील संजय धुलदाणी, कार्तिक भक्तीपु्रम, राजु भाऊ शेरकुरवार,सुखकर, बालाजी होनपारखे,गणपत गौड,मनोहर येरपुरवार, गजानन वंहिदे, नामदेव बोडके,पुष्पा कलाने,सुमनबाई हगवणे, संगीता ढोले,सुमित्रा पठाडे
महानंदा भालेराव हजारो दिव्यांग सहभागी होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे