pub-7425537887339079
ब्रेकिंग

द्रोणागिरीत सकल हिंदू समाजच्या वतीने विराट हिंदूं संमेलन!

'जय श्रीराम'च्या घोषणांनी परिसर दणाणला

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

हिंदू धर्मा विषयी जनजागृती व्हावी, हिंदू धर्मातील व्यक्ती, नागरिकांनी एकत्र यावे, हिंदू समाजाचे मजबूत संघटन उभे राहावे या दृष्टीकोणातून तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर हिंदू संमेलनांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, सकल हिंदू समाज द्रोणागिरी उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदू संमेलन’ प्रचंड जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले. १७ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता, सेक्टर ५०, द्रोणागिरी येथील देवकृपा सोसायटीसमोर हा भव्य सोहळा पार पडला. या संमेलनाला द्रोणागिरी आणि उरण परिसरातील हिंदू समाज अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले म्हणजे यात कोणताही राजकीय पक्ष किंवा मान-सन्मान हा विषय नव्हता. कोणत्याही राजकीय हेतू अजंठा बाजूला ठेवून केवळ आणि केवळ हिंदू धर्माबद्दल कमालीचा आदर आणि धर्माप्रती असलेली निष्ठा जपण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जे या संमेलनाचे सर्वात मोठे यश ठरले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेच्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. या दिंडीसोबत सुरू असलेला हरिपाठ, अभंगांचे सूर आणि हातात घेतलेले भगवे झेंडे यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण द्रोणागिरी मध्ये एक अभूतपूर्व भगवे चैतन्य निर्माण झाले होते. दिंडी परतल्यानंतर व्यासपीठावर राम भक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम बालचमूंनी सादर केले. शंख वादन गणेश वंदनेने उपस्थितांची मने जिंकली. “जय श्रीराम””गर्व से कहो हम हिंदू है_” छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण द्रोणागिरी परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमात डॉ निवेदिता भदाणे यांनी सादर केलेला अप्रतिम कथक नृत्य आविष्कार सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संमेलनात उपस्थित प्रमुख वक्त्यांनी सनातन हिंदू धर्मावर आणि सद्यस्थितीवर प्रखर विचार मांडले. रमेश यादव महाराज यांनी सनातन हिंदू धर्म विषयी प्रखर विचार मांडले तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील रचनेचा दाखला देत त्यांनी उपस्थित त्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले महामंडलेश्वर रामकृष्ण सरस्वती महाराज यांनी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी हिंदूंनी काय करावे लागेल यावर सखोल प्रकाश टाकला परप्रांतीयांचा आपल्या हिंदु राष्ट्रात वाढणारा वावर आणि त्याचे होणारे परिणाम यावर त्यांनी आपले अत्यंत घनाघाती विचार मांडले राजेश कुंटे धर्म जागरण प्रमुख कोकण प्रांत यांनी अत्यंत समावेशक मुद्दे मांडले हिंदू धर्म संस्कृती आणि पर्यावरण यांचा कसा कनिष्ठ संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले. या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहिलेल्या सर्व हिंदू बांधवांसाठी आयोजकांच्या वतीने स्वागत पेय आणि महाप्रसादाची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली या भूतपूर्व सोहळ्यांनी द्रोनागिरी परिसरातील प्रत्येक हिंदूंच्या रोमा रोमात असताना तर हिंदू धर्माबद्दलचा कमानीचा गर्व जागा केला हातवे वेळी कार्यक्रम नव्हता तर हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या ज्या अस्मितेसाठी पेटलेली एक वजन होती हिंदू ने आपल्या अस्तित्वासाठी सुरक्षेसाठी हिंदू राष्ट्राच्या कल्पनेसाठी एकजूट करून हिंदू धर्मावर येणारे प्रत्येक संकट परतवून लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असा संदेश या विराट संमेलनातून संपूर्ण देशभर गेला. आयोजकांकडून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आतिश पाटील यांनी केले होते.एकंदरीत विराट हिंदू संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे