टेंभुर्णीत दिव्यांग कवी आकाश देशमुख यांचा हृद्य सत्कार.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
डोळ्यांनी दिसत नसले तरी शब्दांनी जग जिंकणारे दिव्यांग कवी आकाश देशमुख यांचा टेंभुर्णी येथे विशेष सत्कार करण्यात आला. जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने आयोजित प्रेषित मुहम्मद (स.) परिचय कार्यक्रमात प्रा. वाजेद अली खान यांच्या टीमने हा सन्मान केला.
यावेळी जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने आकाश देशमुख
इमरान जनरल स्टोमसे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि प्रेषितांच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले. सत्काराला उत्तर देताना देशमुख यांनी
मोबाईलवरून आपली स्वरचित कविता सादर केली. त्यांच्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली असून, प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.
इस्लाम हा अपंग, गरीब, अनाथ यांना सन्मान देतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले होते की, माणसाची किंमत त्याच्या शारीरिक क्षमतेने नाही तर त्याच्या विचाराने आणि कार्याने होते. आकाश देशमुख यांची कविता समाजाला नवी दृष्टी देते, असे प्रा. वाजेद अली खान यावेळी म्हणाले. तर, धर्म कोणताही असो तो माणुसकी शिकवतो, हेच आजच्या कार्यक्रमातून दिसून आले. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना आकाश देशमुख यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रकार साबेर शेख यांनी केले.




