संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे पायी दिंडी चे आगमन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
टेंभूर्णी ता जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे श्री संत वासुदेव महाराज पायदळ दिंडी सोहळा यांचे आगमन झाले. सदर दिंडी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा अकोला तर्फे आयोजित केली जाते. या दिंडीचा मार्ग श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोट ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची असा असतो. गुरुवार दिनांक 12/11/2026 पासून प्रारंभ झालेली ही पायदळ दिंडी दिनांक 06/12/2026 रोजी आळंदी येथे पोहोचते. मध्ये अनेक भाविक दिंडीसाठी जेवण व अल्पोपहाराची व्यवस्था करत असते.त्यामध्ये जाधव परिवार कडून सुद्धा टेंभूर्णी येथे दरवर्षी या पायी दिंडीसाठी अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात येते. प्रकाश जाधव , गबाजी जाधव, गोविंद जाधव, विजय जाधव,सुरेश जाधव, तुकाराम जाधव,संतोष जाधव,मनोज जाधव,सतीश जाधव,अमोल जाधव, कडूबा डोमले यांच्याकडून आलेल्या माउलींची यथोचित सेवा केल्या जाते. गावातली अनेक प्रतिष्ठित नागरिक यासाठी उपस्थित राहतात यामध्ये रघुराम साहेब उखर्डे, तानाजी उखर्डे , प्रा दत्ताजीराव देशमुख सर, गणेश डोमळे,रघुनाथ इंगळे,कैलास इंगळे,गणेश जाधव,मधुकर लोणकर, कमळाजी सपकाळ यांची उपस्थिती होती. विनाधारी माऊलींचा श्री गबाजी जाधव यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माऊलींचे चरण घराला लागले तर मन अगदी प्रसन्न होते असे मत श्री प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले. हा सर्व सोहळा संजीवनी इंग्लिश स्कूल च्या प्रांगणामध्ये संपन्न झाला.
