pub-7425537887339079
ब्रेकिंग

नागपुर येथील वैश्य सुवर्णकार समाजाच्या वधु-वर परिचय मेळावा,ज्येष्ठांचा सत्कार कार्यक्रमात समाज बांधवाच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार.

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.29

महाराष्ट्र वैश्य संघ,नागपुर च्या वतीने “राॕयल माँ गंगा सेलीब्रेशन,पारडी ,नागपुर येथे ‘सामुहिक वर-वधु परिचय मेळावा उत्सात संपन्न झाला.या सोहळ्यात समाज बांधवानी मान्यवरांचा सत्कार केला. महाराष्ट्र वैश्य संघ,नागपुर आयोजित दोन दिवशीय (१८व १९ जुन२०२६ )सामुहिक वर-वधु परिचय मेळावा,ज्येष्ठांचा सत्कार समारंभ आणि सामुहिक उपनयन संस्कार सोहळा या भव्य कार्यक्रमास मराठवाडा ,प.महाराष्ट्र येथील छत्रपती संभाजीनगर,बीड,पुणे ,सातारा,येवला(जि.नाशिक )येथुन वैश्य सुवर्णकार समाज संस्था/संघटचे पदाधिकारी,विश्वस्त,समाजबांधव उपस्थित होते. बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बीड वैश्य सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुरेशनाना मेखे हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मान्यवरा सोबत उपस्थित होते.प्रामुख्याने या सोहळ्यास वैश्य सुवर्णकार समाज अनंतसागर सेवा प्रतिष्ठान छ.संभाजीनगर चे अध्यक्ष मनोहरराव कपाळे यांचे नेतृत्व मार्गदर्शनाखाली विश्वस्त अजय(घनशाम)पावटेकर(येवला),वैश्य सुवर्णकार समाज युवक मंडळ छ.संभाजीनगरचे अध्यक्ष संजय सराफ , उपाध्यक्ष संजय कपाळे ,सचिव वामनराव सराफ,सदस्य भगवानराव कानवे ,मंगेश ढेकळे ,वैश्य सुवर्णकार समाज,अकोला चे विजयराव सेलुकर,बीडचे अरुणराव करमाळकर,संजयराव करमाळकर आदींनी व्यासपीठावर महाराष्ट्र वैश्य संघाचे अध्यक्ष अनिलजी वलोकार व पदाधिकारी तसेच इतर मान्यवर यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास प्रभाकरराव साबनकर (पुणे),किशोर पावटेकर(येवलेकर),रोहित देवगिरीकर (सातारा)तसेच भोकरदन ,सिंदखेडराजा आदी भागातील उपवर मुला -मुलींना घेऊन पालक या सोहळ्यास आले होते.या दोन दिवशीय कार्यक्रमात चहा ,अल्पोपहार,स्वादिष्ट भोजन तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सदरील वैश्य सुवर्णकार समाजाचा सोहळा नागपुर येथे उत्साहात संपन्न झाला.आयोजकांचे विविध समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन याबाबत उपस्थित समाजबांधव ,पदाधिकारी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे