धनुष्यबाण स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी केली कांस्यपदकाची कमाई…..

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन धनुष्यबाण स्पर्धा पी. ई.एस. शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या, या स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाची खेळाडू कु.अक्षरा सतीष घाटेकर या विद्यार्थ्यांनीने कांस्यपदक जिंकुन महाविद्यालयाचे नांव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर करण्याचा बहुमान पटकावला. आमच्याच मह व द्यालयाचा विद्यार्थी .. यश राजू साळवे याचा पाचवा क्रमांक आला.खेळाडूंच्या या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के , संस्थेचे सचिव मा. डॉ.राहुलजी म्हस्के ,प्राचार्य मा. डॉ.सविता सिनगारे ,उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे , उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे ,व महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन प्रा. उदय वझरकर,प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य यांचे लाभले.




