टेंभुर्णी येथील देशमुख परिवारातील लेकीचा, नवरदेवाप्रमाणे वरात काढून सन्मान, देशमुख परिवारात मुलीचा पहिल्यांदाच आदर्श पायंडा पाडून मान

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8
मुलगी म्हणजे घरातील लक्ष्मी, मुलगी माझ्या घरातील मानसन्मान, मुलीचा विवाह म्हणजे बापाच्या काळजात तुकडा, त्या मुलीचा सन्मान करणे प्रत्येक बापाचे कर्तव्य असते. प्रत्येक मुलीचा बाप आपल्या मुलीच्या लग्नामध्ये हौसमौज पूर्ण करत असतो. लेकीच्या लग्नात नवऱ्या मुलाकडे पाहुणचाराचा मान आहे यासाठी तो झटत असतो. परंतु टेंभुर्णीतील देशमुख परिवाराने एक नवा पांडा अनेक आदर्श पायंडा पायंडा ठेवलेला आहे. टेंभुर्णी म्हणजे जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे गाव. या गावांमध्ये देशमुख कंपनीला सन्मानाचा मान असतो. या सन्मानाचाच आदर्श पांडा पाडून देण्यामध्ये देशमुख परिवारातील मंडळींनी पुढाकार घेतला. शांताराम उर्फ राजू झिंगराव देशमुख यांची कन्या सुषमा, तिचा विवाह तालुका बार्शी येथे होत असून, मुलीच्या मान सन्मानासाठी व नवरदेवाच्या इछे खातर हा विवाह नवरदेवाच्या घरी होत आहे. आपण पाहतो नवरदेव हात नवरीच्या घरी वरातीने जात असतो. आणि त्याची आदल्या दिवशी वरात काढल्या जाते. पण बहुदा मुलींचा वरात मानसन्मान केल्या जात नाही. अशातच या मुलीचा मान सन्मान करायचं देशमुख परिवाराने ठरवलं. या पायंड्यामध्ये देवराव मालपा देशमुख व्हा. चेअरमन महेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था, अध्यक्ष महेश शिक्षण संस्था, तसेच माझी चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी टेंभुर्णी चे अंकुश पाटील देशमुख, हौसेराव देशमुख, प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, कैलास देशमुख दिनकर देशमुख, अमोल देशमुख यांनी पुढाकार घेऊन वरात काढण्याची ठरवली आणि त्यांनी मान सन्मानाने नवरीला नवरदेवाकडे वरात काढून पाठवले. या आदर्श पांयड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशमुख परिवाराचा मान सन्मान गावामध्ये वाढलेला आहे. चौकट:- टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे नेते, भाजपा कार्यकारिणीचे जाफराबाद तालुका सक्रिय सदस्य, आता संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य, भिकनखा पठाण, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण उखर्डे, यांनी राजू पाटील यांचा सत्कार केला. मुलीचा लक्ष्मी समजून सन्मान केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा केले. मुलीचा मान सन्मान वाढला पाहिजे समाजामध्ये मान वाढला पाहिजे ही भावना आता रूढ होत आहें.




