pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिव्यांग,वृध्द,निराधाराना हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत २५ नोव्हे. २०२६ जिल्हाधिकारी नांदेड येथे बे मुध्दत धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला ईशारा

0 5 3 6 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ प्रतिनिधी,दि.13

नांदेड दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग,वृध्द निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दि. २५ नोव्हे २०२६ पासून बे. मुध्दत धरने आंदोलन करण्याचे निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल शिष्टमंडळाने दिला ईशारा.
दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात माजी व आजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी बारा बैठका, एक सुनावणी घेऊन कनिष्ठ अधिकारी यांना आदेश, निर्देश,व इतिवृतातील अवलोकन अहवाल देण्यात यावे म्हणून, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, उपजिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी वेळोवेळी आदेश देऊन कनिष्ठ अधिकारी
एकाही प्रश्नाचे साधे ऊतर
मिळत नाही. संघटनेने वेळोवेळी निवेदनाद्वारे जे कनिष्ठ अधिकारी वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश पाळत नसतील दिव्यांग बांधवाना हक्का पासुन वंचित ठेवत असल्यामुळे त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याप्रमाणे जिल्हा अधिकारी यांनी कार्यवाही करावी म्हणून दिलेल्या निवेदनाची दखल घेत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील काहि तालुक्यातील तहसिलदार नायब तहसीलदार यांचा नागरिकासोबत केलेला कृति सर्वाना माहिती आहे.
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृध्द,निराधाराच्या अनेक प्रश्नासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी संबधित अधिकारी यांच्याकडून प्रश्न सुटत नसल्यामुळे मा. जिल्हाअधिकारी कार्यालय येथे धरने, मोर्चे, झोपा काढो आंदोलन, गाढव मोर्चा, मुंडण आंदोलन, घेराव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित केल्यामुळे मा. जिल्हाअधिकारी नांदेड यांनी इ. स. २०२२ ते आजपर्यंत अनेक बैठका संबधित अधिकारी, दिव्यांग संघटने सोबत घेऊन बैठकीतील ईतिवृतातील प्रश्न तर सुटत नाही पण ते प्रश्नाचे साधे ऊतर जिल्हाधिकारी कार्यालय ने वेळोवेळी मागणी करुन देत नसतील तर बैठकीचा काय अर्थ व कनिष्ठ अधिकारी
ऑफिस मध्ये भेटत नाहित फोन केला तर उचलत नाहित, दिव्यांग बांधव उठत बसत चेकरा मारून वैतागून लोहा येथे तहसिल कार्यालयात दिव्यांगाने आत्महत्या केली व संघटनेच्या निवेदन स्व ईच्छा दिव्यांग,वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना भेटुन निवेदनाद्वारे झालेल्या बैठकीतील ईतिवृतातील किती प्रश्न सुटलेत व किती प्रश्न का सुटले नाहित यांचे ऊतर पंधरा दिवसांत द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी द्यावी अशा निवेदनाचे सात महिन्यात साधे ऊतर मिळत नाही. यांचा अर्थ दिव्यांग आत्महत्या करावे अशी मुक संमती अधिकाऱ्याची आहे काय? वर्ष न वर्ष ते इतिवृतातील प्रश्न का सुटत नाहीत? आपल्याकडून सुटत नसेल तर त्यांचे लेखि ऊतर का मिळत नाहि ? . त्याबद्दल जिल्हाअधिकारी साहेब दोषी कर्मचारी यांच्यावर योग्य ती दिव्यांग कायदा व दप्तर दिरगांग कायद्याने कार्यवाही का करावी म्हणून निवेदनाची दखल का घेत नाहीत?.
*खालील प्रमुख दोन मांगन्या*
१) दिव्यांगास राजकिय प्रतिनिधी ऊदा. स्विकृत सदस्य मिळावे.
ऊदा. तामिळनाडू, छत्तीसगढ राज्यस्थान मध्ये लागु आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात लागु करा.
२) दिव्यांग, वृध्द, निराधाराना दरमहा सहा हजार मानधन देण्यात यावे
मा. कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी साहेब हे दोन मुद्दे मंत्री महोदय यांना पाठऊन सहकार्य करावे
आपल्या अंतर्गत निवेदनातील ईतिवृतातील किती प्रश्न सुटलेत व किती सुटलेच नाहि संबधित अधिकारी का ऊतर देत नाहित?यांची चौकशी त्वरित करून दोषावर योग्य ती कार्यवाही करा दिव्यांग हक्क द्या? नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी देऊन या दिव्यांग जन्मातील मुक्त करा निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर बे मुध्दत अनेक प्रकारचे धरने आंदोलनाचा ईशारा दिव्यांग, वृध्द निराधार शिष्टमंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील जिल्हा अध्यक्ष मनोहरराव येरपुरवाड ज्ञानेश्वर नवले, माजी जिल्हा अध्यक्ष चांदराव चव्हाण हदगाव ता. ऊपअध्यक्ष दिंगाबर लोणे ता. अध्यक्ष अर्धापूर, सखाराम बरिदे, सविता गच्चे ईत्यादि पदाधिकारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे