महिला मोर्चाची ताकद वाढवा, प्रत्येक घरापर्यंत भाजपाचा विचार पोहोचवा – भास्कर आबा दानवे
भाजपाचे संघटन अधिक मजबूत करू - कल्पनाताई डांगे महिला मोर्चाच्या माध्यमातून जालना महानगरात संघटनेची नवी ताकद उभी करू - शुभांगीताई देशपांडे जालना शहराची भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.29
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जालना महानगरातील संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे व जालना महानगर प्रभारी सौ. कल्पनाताई डांगे, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष शुभांगीताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे आदींची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान जालना महानगरातील विविध मंडळांच्या महिला मोर्चा मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नवीन जालना मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीमती स्नेहा राजेश जोशी, जुना जालना मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. दिपाली दिलीप बिनीवाले, पूर्व जालना मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. रश्मी शशिकुमार टेकवाणी तसेच महानगर ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. सुषमा गजानन खरात यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. महिला मोर्चाची भूमिका पक्षाच्या संघटनात्मक कार्यात अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक मंडळात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करून पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. कल्पनाताई डांगे म्हणाल्या की, महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच बूथ पातळीपर्यंत महिला संघटन मजबूत करून अधिकाधिक महिलांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचे काम करावे.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जालना महानगर जिल्हाध्यक्षा सौ. शुभांगीताई देशपांडे यांनी नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “महिला मोर्चाच्या माध्यमातून जालना महानगरातील प्रत्येक मंडळ आणि बूथ पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे. महिलांना संघटनेशी जोडून त्यांना नेतृत्वाची संधी देत पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला मोर्चा प्रभावीपणे कार्य करेल.”
श्रीमती स्नेहा राजेश जोशी यांनी नियुक्तीबद्दल पक्षाचे आभार मानत, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सौ. दिपाली दिलीप बिनीवाले यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करून, महिलांना मोठ्या संख्येने संघटनेशी जोडून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. सौ. रश्मी शशिकुमार टेकवाणी यांनी मिळालेल्या संधीबद्दल पक्षाचे आभार मानले. महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सौ. सुषमा गजानन खरात यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पक्षाचे विचार व शासनाच्या लोककल्याणकारी योजना पोहोचवून महिला संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी असंख्य महिलांची उपस्थिती होती.



