उरण तालुक्यातील सारडे या गावी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )उरण शाखेचे बहारदार कविसंमेलन झाले. भेंडखळ गावच्या उपसरपंच संगीता मेघश्याम भगत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल बी पाटील, शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,के.एस.पाटील,सुनंदा पाटील आदी मान्यवर होती.
प्रास्ताविक गंधार पाटील यांनी नवरात्रीमधील दुर्गामातेचे महत्त्व स्पष्ट करून समाजातील आजच्या महिषासुर अधिक घातक आहेत,सांगून आयोजक सारड्याच्या पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
म.का.म्हात्रे यांच्या सुरेख सूत्रसंचालनात बहारदार कविसंमेलन रंगले.बालकवी अनुज शिवकर,अभ्यासू कवी केशव म्हात्रे,रांगड्या आवाजाचे शाहीर अनंत पाटील,अजय शिवकर, मच्छिंद्र म्हात्रे,साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांनी आगरी ढंगात कविता सादर करून वातावरण हलकेफुलके केले.
जे एस पाटील, एम, एस पाटील,सुनील पाटील,हरिश्चंद्र पाटील आणि पाटील कुटुंबीयांनी अतिशय सुरेख नियोजन केले.सुनील केशव यांनी उपस्थितांचे आभार मानले.