pub-7425537887339079
ब्रेकिंग

आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनीधी,दि.6

पहिले आयर्नमॅन होण्याचा बहुमान पटकावत जालन्याचे नाव जागतिक पातळीवर झळकवल्याबद्दल आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा जालन्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. जालन्यातील रहिवाशी असलेले कैलास झोळगे यांनी आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत जालन्याचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जालन्यातील क्रीडा प्रेमी आणि मित्र परिवाराच्या पाठबळामुळे कैलास झोळगे यांनी मागील महिन्यात व्हिएतनाम येथे आयोजित अत्यंत कठीण जागतिक आयर्नमॅन 140.6 मैल स्पर्धेत स्विमिंग 3.8 किमी, सायकलिंग 180 किमी, रनिंग 42.2 किमी असे सलग 226 किलो मिटर अंतर 15.23 तासात यशस्वीरित्या पूर्ण करून आयर्नमॅन किताब पटकावत जालन्याचे नाव जागतिक पातळीवर झळकावले तसेच जालन्याचे पहिले आयर्नमॅन होण्याचा बहुमान प्राप्त केल्यामुळे कैलाश झोळगे यांना जालन्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आयएएस अधिकारी रंगमंजु आर., अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनीषा देशपांडे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, नायब तहसीलदार विक्रांत मोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या गौरवाबद्दल आयर्नमॅन कैलास झोळगे यांच्यावर जालन्यातील क्रीडा प्रेमी आणि मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

आयएएस अधिकारी रंगमंजु आर., अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनीषा देशपांडे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, नायब तहसीलदार विक्रांत मोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या गौरवाबद्दल आयर्नमॅन कैलास झोळगे यांच्यावर जालन्यातील क्रीडा प्रेमी आणि मित्र परिवाराकडून अभिनंद
नाचा वर्षाव केला जात आहे.
आयएएस अधिकारी रंगमंजु आर., अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल,भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मनीषा देशपांडे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, नायब तहसीलदार विक्रांत मोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या गौरवाबद्दल आयर्नमॅन कैलास झोळगे यांच्यावर जालन्यातील क्रीडा प्रेमी आणि मित्र परिवाराकडून अभिनंद
नाचा वर्षाव केला जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे