pub-7425537887339079
ब्रेकिंग

दत्तनगर भागाला पाणीपुरवठा पंधरा दिवसानंतर, खडकपूर्णाचे पाणी सुरू होऊ नये उपयोग नाही — दत्तनगर भागातील नागरिकांची खंत

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी /प्रतिनिधी,दि.19

25 ते 30 हजार लोकवस्तीचे गाव. तालुक्यापेक्षा मोठे गाव असलेले टेंभुर्णी गावांमध्ये खडकपूर्णा धरणावरून पाणीपुरवठा योजना सुरू झालेली आहे आहें. उशिरा का होईना खडकपूर्णा धरणाची पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याबद्दल नागरिकात आनंद होता. परंतु मोठ्या वस्तीचा भाग असलेल्या दत्तनगर भागामध्ये खडकपूर्णा धरणाचे पाणी सुरू होणे 15 ते 20 दिवसानंतर पाण्याची व्यवस्था केल्या जात आहे. आयुष्या उर्दू शाळेच्या मागील टाकीवरून सध्या पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मूळ कब्रस्तान मध्ये असलेली पाणीपुरवठा योजनेची टाकी इथून पाणीपुरवठा सध्या बंद आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार दत्तनगर व परिसरातील 14 ते 15 जून तयार करण्यात आलेले आहे असे सांगण्यात आले. या 14 ते 15 जूनला पाणीपुरवठा करायचा असेल तर साधारणता तीन टाक्या पाहिजे. परंतु नियोजनाच्या अभावामुळे पाणीपुरवठा 15 ते 20 दिवसांनी होतो आहे त्यामुळे दत्तनगर परिसरातील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे असे नागरिकांनी आमच्या वृत्त प्रतिनिधी जवळ बोलून खंत व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायत वर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे व ग्रामपंचायत सदस्यांचा कारभार नसल्याने याकडे कोणी लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व मुख्य प्रशासक यांनी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे असे सर्व ठरावतून मागणी होत आहे. गावातील पाणीपुरवठा जेव्हा सुरू होतो तेव्हा मुख्य रस्त्यावरून पाणीच पाणी साचल्या जाते. ड्रेनेज तयार केलेले आहेत पण ड्रेनेज मधून पाणी जात नाही नाल्यांची व्यवस्था सुद्धा बिकट आहे त्यामुळे पाणी आल्यानंतर सर्व रस्त्यांवर पाणी असते. गावातील छोट्या रस्त्यांवर सुद्धा पाणी असते त्यामुळे नागरिकांना चालताना त्रास होतो. याकडे सुद्धा ग्रामपंचायतच्या प्रशासकांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशी टेंभुर्णी ग्रामस्थांची मागणी आहे. एका सुज्ञ नागरिकांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ग्रामपंचायतचा कारभार सोपानराव पाटील सरपंच व हरिभाऊ मुळे सरपंच असताना कर्मचारी सर्व व्यवस्था पाहून घेत होते त्यांचा धाक कर्मचाऱ्यावर होता असं सांगितल्या जाते. तेव्हा नुसते कागदोपत्री व्यवहार होऊन ग्रामपंचायत चा कारभार चालत नसतो गावाचा विकास होत नसतो ही बाब यातून अधोरेखित होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मुख्य प्रशासकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे एवढ्या मोठ्या गावाची समस्या निर्माण होताना आपण कुठेतरी कमी पडत आहोत याची भावना गावकऱ्यांमध्ये तयार होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे