विधानसभेत शेतकरी, कष्टकरी व जालना शहरातील विविध प्रश्न मांडल्याबद्दल आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार
जालना/प्रतिनिधी,दि.04
विधानसभा अधिवेशनादरम्यान माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना शहरासह जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न अत्यंत तळमळीने विधानसभेत मांडल्याबद्दल गोंदेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने त्यांचा शिवसेना संपर्क प्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, विभाग प्रमुख प्रभाकर घडलिंग यांच्यासह वाघ्रूळ, धावेडी, गोंदेगाव आणि वंजार उमरद येथील पदाधिकारी उपस्थित होते. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नसून त्यासाठी अनेक अडचणी आणि जाचक अटींचा सामना करावा लागत असल्याचे शिवसेना संपर्क प्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आमदार खोतकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत आमदार खोतकर यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला. तसेच जालना शहरात वाढत असलेले बालगुन्हेगारीचे प्रमाण, तरुण पिढीचे वाढते गुन्हेगारीकरण, बटन गोळी, गुटखा यांसारख्या व्यसनाधीनतेवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. याशिवाय जालना शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिडको प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी तसेच जिल्ह्यातील वीज प्रश्न तातडीने सोडवावा, अशा विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आमदार खोतकर यांनी विधानसभेत ठामपणे आवाज उठवला. सत्कार प्रसंगी सरपंच बाळू पाचरणे, चेअरमन पांडुरंग तिडके, सरपंच मल्हारी पठाडे, तालुका प्रमुख भगवान आंबोरे, शेख फकीरा, शाहू खंदारे, निवृत्ती साबळे, रमेश वाघ, कडूबा इंदलकर, पोलीस पाटील मगर, महादू वाघ यांच्यासह पानशेंद्रा, धावेडी, गोंदेगाव, वंजार उमरद आदी गावांतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

