pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुष्पक नगर येथे १० फुटी अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान

सर्पमित्र साजन वास्कर आणि प्रज्वल शिंदे यांची तत्परता; अजगराला जंगलात सुखरूप सोडले

0 4 9 7 3 3
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
पनवेल तालुक्यातील पुष्पक नगर येथे दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नाल्यामध्ये आढळलेल्या सुमारे १० फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथन (Indian Rock Python) या अजगराला केअर ऑफ नेचरचे पनवेल विभाग प्रमुख तथा सक्रिय सदस्य तथा सर्पमित्र साजन सुनील वास्कर आणि प्रज्वल शिंदे यांनी सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यानंतर या अजगराला नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
नाल्यामध्ये अजगर आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. अजगराला कोणतीही इजा होऊ न देता काळजीपूर्वक पकडून त्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
केअर ऑफ नेचरचे पनवेल विभाग प्रमुख तथा सर्पमित्र साजन सुनील वास्कर आणि प्रज्वल शिंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अजगराला जीवदान मिळाले. वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि साप दिसल्यास त्यांना न मारता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घेणे आवश्यक आहे, असा संदेश सर्पमित्रांनी दिला आहे.कोणतेही साप दिसल्यास त्याला मारू नका. त्यांना नैसर्गिक अधिवासात, जंगलात सोडा असे आवाहन केअर ऑफ नेचर या पर्यावरण प्रेमी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 3 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे