नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न. ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
नवतरुण मित्र मंडळ, पाणजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा सहलीचे औचित्य साधून वृक्षारोपण तसेच शिवमंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या सदस्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच शिवमंदिर परिसराची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा आदर्श निर्माण केला आहे.यावेळी अक्कादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात आर. झुंजारवाला ट्रस्टचे डॉक्टर व सहकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच लकपती पाटील, माजी उपसरपंच अविनाश पाटील, मंडळाचे अध्यक्ष दर्शन पाटील, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सदस्य अरुण पाटील, जितेंद्र पाटील, ॲड. विक्रम पाटील, मिलिंद पाटील, मंजीत पाटील, दीपेश पाटील, नंदलाल पाटील, सुशांत पाटील, सुनील पाटील, सचिन भोईर, महेंद्र पाटील, प्रकाश पाटील, लहुराज भोईर मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.४२ वर्षे परंपरा जोपसणारे नवतरुण मित्र मंडळाच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, युवकांनी केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



