pub-7425537887339079
ब्रेकिंग

गांजासह तरुण जेरबंद; ३.०८ लाखांचा गांजा जप्त!

0 4 8 2 0 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. जालना शहरातील नूर शहा वली दर्गा रोडवरील बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका २४ वर्षीय तरुणाला गांजासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज सदाशिव हाडगळे (वय २४, रा. महेबूबनगर, अंबड) याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

जालना जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून, आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 0 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे