दत्तनगर जिल्हा परिषद शाळा टेंभुर्णी येथे शाळा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर टेंभुर्णी येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आनंदाच्या वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रवेश हा आनंददायी असला पाहिजे व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास आनंद वाटला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका जामदार मॅडम यांनी याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्याचे पुस्तक वाटप अरुण स्वागत करण्यात आले. यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी आनंदाने पुस्तक घेतली नवीन पुस्तका असल्याने विध्यार्था मध्ये यावेळी आनंद दिसला. सात खेळत रमत कमत शाळेमध्ये येणे आणि अभ्यास करणे हा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव असतो. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असेही यावेप्रसंगी सांगितल्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री योगेश गडकर मुख्याध्यापक मीना जामदार मॅडम शिक्षक श्रीकृष्ण आव्हाळे सर. सौ. संध्या ताई लोखंडे मॅडम. सौ. अश्विनीताई उगले मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



