pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करा- शिवसेना नेते अंबादास दानवे

गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे- जिल्हाप्रमुख महेश नळगे - महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

जालना जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक २२ एप्रिल रोजी जालना येथे शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाभरातील तरुण शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी गाव-खेड्यातून सच्चा शिवसैनिकांची उपस्थित होती तर यावेळी तरुण शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना जिंदाबाद…अशा गगनभेदी घोषणांनी बैठक स्थळ दणाणून गेले होते. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधतांना शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले की, हे वर्ष वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात यावी. तालुकानिहाय दौरे करून शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करावा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, भजन स्पर्धा,नोंदणी यांचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहनही दानवे यांनी केले. यावेळी बोलतांना नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक करीत असतांना जिल्ह्यात शिवसेनेची १९९५ सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन शिवसैनिकांना करत प्रत्येक गावात शाखा पुनर्बांधणी करून १८ ते २५ वयोगटातील युवा तरूण पुन्हा शिवसेनेच्या सोबत जोडण्यात यावा. रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी तसेच बीएलओची नेमणूक करण्यात यावी, मतदार यादीकडे लक्ष द्यावे, गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम राबविण्यात यावी. जालना जिल्हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरचासरणीचा गड असून भगवा झंझावात जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी अंग झटकुन कामाला सुरुवात करावी अशी साद जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी घातली. जिल्हाप्रमुख महेश नळगे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे. ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी करावी, तरुणांना मोठ्या प्रमाणात शिवसेनेत संधी असून त्या संधीचे सोनं कार्यकर्त्यांनी करावे, असे आवानही जिल्हाप्रमुख महेश नळगे यांनी केले. तर महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपमताई घुगे यांनी महिला आघाडी मजबूत करण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मी यासाठी जिल्हाभर फिरणार असून महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची माझी तयारी असल्याचे सांगितले. तसेच महिलांची ओढ आता शिवसेनेकडे असून जास्तीत-जास्त महिलांची भरणा आता शिवसेनेत करणार आहे. यावेळी जेष्ठ जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ,माधव कदम, भगवानराव कदम,हनुमान धांडे, परमेश्वर जगताप, अशोक आघाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रूपमताई घुगे,गणेशराव काळे, डॉ. राजेश राऊत,तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, कुंडलिक मुट्ठे, प्रदिप बोराडे, संदिप कंटुले, बाळासाहेब गावडे ,दिनेश काकडे, जयप्रकाश चव्हाण, गणेशराव दराडे,भारत पंडीत, शहरप्रमुख महेश पुरोहित, दीपक रणनवरे, संदीप झारखंडे,चेतन भुरेवाल,सुभाष राऊत,सुदाम काळे, ज्ञानेश्वर सहाणे,तुळशीराम काळे,अंकुश राजे, विजय बोरुडे, संदीप पाचोरे संजय जाधव, देविदास राठोड, अनिस हशामखान पठाण,शाहीर बाळापुरे, अशोक सोळंके, गजानन घुगे, महादेव शिंदे, कल्याणराव टकले, नवनाथ खांदेभराड अर्जुन पवार,अर्जुन ठोंबरे, विलास करतारे, प्रल्हाद जाधव, चंदू पाटील, मुकेश माकोडे,बाबासाहेब पाखरे, सुरेश राणा राजपूत, संतोष बरगे, मुकुंद हुसे, हरिभाऊ मुठे अतिष पठाण, अंकुश वाघ रंगराव मुळे, सुरेश भंडारी,गणेश गायकवाड, बापू घटमल, संजय खंदारे, अंकुश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व सर्व आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे