pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्ह्यात साखरेच्या घाऊक उपभोक्तासाठी साखर साठवून ठेवण्यावर मर्यादा

0 4 8 4 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी “Sugar (Stockholding Limit of Bulk Consumers) Order, 2026” निर्गमित केला आहे. हा आदेश 1 सप्टेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे.

या आदेशानुसार दरमहा 10 मे.टन किंवा त्यापेक्षा अधिक साखर वापरणाऱ्या घाऊक उपभोक्ता (Bulk Consumer) कडे 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी साखरेचा साठा ठेवता येणार नाही. घाऊक उपभोक्ता (Bulk Consumer) मध्ये कन्फेक्शनरी उत्पादक, शीतपेय उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग, मिठाई विक्रेते तसेच मागील एका वर्षातील चालू महिन्याव्यतिरिक्त कालावधीचा विचार करता दरमहा किमान 10 मे. टन साखर वापरणारे अन्य संस्थात्मक खरेदीदार यांचा समावेश आहे.

साखर कारखान्यांकडून घाऊक उपभोक्ता (Bulk Consumer) ला थेट अथवा दलालामार्फत करण्यात येणाऱ्या साखर विक्रीची मासिक मात्रा संबंधित विक्रेता/खरेदीदाराने दाखल केलेल्या GST Returns च्या आधारे पडताळण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी, घाऊक विक्रेते, घाऊक उपभोक्ता (Bulk Consumer) तसेच संबंधित साखर कारखान्यांना केंद्र शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना आहे. सर्व संबंधितांनी केंद्र शासनाच्या आदेशातील साखर साठा मर्यादेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 4 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे