सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्ष बी. फार्मसी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
टेंभुर्णी जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, जाफ्राबाद संचलित सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी येथील द्वितीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची उत्कृष्ट कामगिरीद्वारे छाप पाडली आहे.
या परीक्षेत शिवानी संतोष जाधव हिने 8.03 SGPA मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रोशनी खुशालराव देशमुख हिने 8.00 SGPA मिळवत द्वितीय क्रमांक, तर वैशाली बजिराव गावंडे हिने 7.91 SGPA मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. सुरेखाताई संजय लहाने, सचिव श्री. संजयजी लहाने तसेच सहसचिव श्री. सुयश संजय लहाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुजाहिद नसिर पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
द्वितीय वर्ष बी. फार्मसीमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णीच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

