टेंभुर्णी कार्तिक फेरीची ५० वर्षांची परंपरा कायम,

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26
टेंभूर्णी ही संताची भूमी असून येथे चंदनराव बाबा रंगनाथ महाराज यांच्या सह अनेक थोर संताची भूमी राहिलेली आहे.त्यांच्या आशीर्वादाने येथील सत्संगाचे सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडत आहे.कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने कार्तिक स्नानाची व प्रभात फेरीची ५० वर्षांची परंपरा टेंभुर्णीत आजही जोपासली जाते.संत चंदन राव बाबा यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या कार्तिक फेरीला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली.
गावातील युवकांनी भक्ती मार्गाकडे वळून व्यसनमुक्त राहावे, म्हणून ही परंपरा सुरू करण्यात आली. पूर्वी सकाळी चार वाजता जीवरखा नदीमध्ये कार्तिक स्नान करून दत्त मंदिरात ही फेरी गावातील प्रमुख रस्त्यावरून भजन-कीर्तन गात जात असे. परंतु मागील अनेक वर्षांपासून नदीला पाणी येत नसल्याने भाविक घरूनच स्नान करून फेरीत सहभागी होतात.
कार्तिक फेरीची सांगता मंगळवारी दत्त मंदिर परिसरात महाप्रसादाने होणार आहे. सात दिवसीय फेरीची सांगता दरवर्षी वरुण-पोळीच्या महाप्रसादाने केली जाते. यानिमित्ताने १५ ते २० क्विंटल गव्हाच्या पोळ्या केल्या जातात.
विशेष म्हणजे महिला मंडळ मागील पन्नास वर्षांपासून या सोहळ्यासाठी पोळ्या टाकण्यास सहकार्य करते.प्रारंभी रघुराम उखर्डे, संतोष शेठ काबरा,देव सर महादू भागवत,शंकर उखर्डे यांनीही परंपरा सुरू ठेवली होती.
यंदा फेरीमध्ये गंगाराम धनवई, भागाजी पाचे, तानाजी उखर्डे, भगवान पवार, संकेत वाघमोडे, किरण आहेर, समाधान उखर्डे, रामदास डोंबळे, विठ्ठल अप्पा डोंबळे, सुशीला देशमुख, सुनीता देशमुख, हरिभाऊ जाधव, महादू इंगळे, मंजिराम बोरहाडे, पुंजाजी उखर्डे, बंडू सोनार, पोपट धनवई, अशोक उखर्डे, रामचंद्र भागवत, भाऊसाहेब देशमुख, विठ्ठल उखर्डे, व गावातील सर्व भक्त मंडळी कार्तिक स्नान दिंडी सोहळ्यात सहभागी असतात
——————————————————————–
सद्गुरु चंदन बाबांच्या प्रेरणे लक्ष्मण कौसाजी रंगनाथ भागवत, धनाजी भागवत, सुरडकर,रुखमण सपकाळ, बाळाजी धनवाई, तसेच इतर भक्तमंडळांनी सुरू केलेला भंडारांची परंपरा व कार्तिक देवीची परंपरा आजही कायम आहे. जुनी भक्तमंडळी आज नसली तरी त्यांचे वारसदार ही नित्यनेमाने फेरी करत असतात आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम करत असतात.


