जाफराबाद तालुक्याच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे ट्रेनिंग टेंभुर्णी ला, गट शिक्षणअधिकारी तलत मॅडम, डॉक्टर प्रकाश मांन्टे यांची भेट

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13
प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येते. यावर्षीचे प्रशिक्षण आज दिनांक 13 नोव्हेंबर पासून सुरू झाले असून ते 22 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. जाफराबाद तालुक्याच्या प्रशिक्षण केंद्र हे टेंभुर्णी येथील श्रीमती जे बी के व नवभारत कनिष्ठ महा विद्यालयात आहे. हे प्रशिक्षण जालना जिल्ह्याचे शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्या प्राचार्य श्रीमती देशमुख मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये तसेच जाफराबाद तालुक्याचे समन्वयक डॉक्टर प्रकाश मांडे डॉक्टर भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तलत मॅडम यांच्या सूचनेनुसार, शिक्षण विस्तार अधिकारी खांडेभराड शिक्षण विस्तार अधिकारी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनात, नारायण पिंपळे यांच्या नेतृवात , प्राध्यापक दत्ता देशमुख, डॉक्टर आनंदराव जाधव, माधव शिंदे गुरुजी, प्राध्यापक दाभाडे सर, संजय वरशीळ , वाघ सर, आल्हाट सर, दत्ताचेके सर, झिंगाराव सपकाळ, गाढवे सर, आदींच्या मार्गदर्शनात वरिष्ठ निवड प्रशिक्षण पार पडत आहे. या प्रशिक्षणामध्ये ज्या प्रभात तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त करतानाच प्रशिक्षणार त्यांना मार्गदर्शन करून दररोज हजर राहून दर तासिकेला हजर राहून आणि या व्याख्यानाचा फायदा घेऊन आपण स्वतः अपडेट व्हावं अशी भावना व्यक्त केली. डॉक्टर प्रकाश मांन्टे यांनी सुद्धा उद्घाटनाच्या वेळेस शिक्षणार्थ्यांना महत्त्वाच्या आणि मोलाच्या सूचना दिल्या हे सर्व प्रशिक्षण दोन प्रकारचे असून ऑफलाइन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये आपणास सहभाग घ्यायचा आहे आणि प्रशिक्षण उत्तम रीतीने पार पाडायचे आहे अशा सूचना केल्या. शिक्षणाला दोनशेच्या वर प्रशिक्षनार्थी त्यांनी नोंद केल्याचे नारायण पिंपळे यांनी सांगितले




