pub-7425537887339079
ब्रेकिंग

एकट्याने पंढरीची वारी; माजी सरपंचाचा अनोखा संकल्प

0 4 6 4 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

टेंभुर्णी : आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्एकट्याने पंढरीची वारी; माजी सरपंचाचा अनोखा संकल्प टेंभुर्णी : आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीच्या विठ्ठलाचे. लाखो भाविक दिंड्यांच्या माध्यमातून पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. मात्र, दिंडीत सहभागी न होता ‘एकट्यानेच’ पायी वारी करण्याचा दुर्मीळ संकल्प जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील माजी सरपंच लक्ष्मण शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या दिंडीची सध्या परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. लक्ष्मण शिंदे हे मागील नऊ वर्षांपासून सातत्याने पंढरपूरची वारी करत आहेत. आतापर्यंत ते आळंदीपर्यंत बसने जाऊन माऊलींच्या दिंडीत सहभागी होत असत. मात्र, यावर्षी त्यांनी घरापासूनच पायी वारीचा संकल्प केला होता. यासाठी ते कुंभारझरी येथील ह.भ.प. सोनुने गुरुजींच्या दिंडीत सहभागी होणार होते. परंत. ऐनवेळी काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना वेळेवर निघता आले नाही. वारीची ओढ स्वस्थ बसू देईना, म्हणून त्यांनी दिंडी निघाल्यानंतर ३ दिवसांनी घरापासून एकट्यानेच पायी प्रवास सुरू केला. मंगळवारी टेंभुर्णीतून निघालेल्या शिंदे यांनी पहिल्या दिवशी ४० किलोमीटरचे अंतर कापत जालन्यात मुक्काम केला. आता ते दररोज २५ ते ३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत आहेत. या प्रवासाबाबत ते म्हणतात, “दिंडीत मी एकटा चालत असलो, तरी सदैव पांडुरंग सोबत असल्याचा भास होतो.”यांना वेध लागतात ते पंढरीच्या विठ्ठलाचे. लाखो भाविक दिंड्यांच्या माध्यमातून पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. मात्र, दिंडीत सहभागी न होता ‘एकट्यानेच’ पायी वारी करण्याचा दुर्मीळ संकल्प जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील माजी सरपंच लक्ष्मण शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या दिंडीची सध्या परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. लक्ष्मण शिंदे हे मागील नऊ वर्षांपासून सातत्याने पंढरपूरची वारी करत आहेत. आतापर्यंत ते आळंदीपर्यंत बसने जाऊन माऊलींच्या दिंडीत सहभागी होत असत. मात्र, यावर्षी त्यांनी घरापासूनच पायी वारीचा संकल्प केला होता. यासाठी ते कुंभारझरी येथील ह.भ.प. सोनुने गुरुजींच्या दिंडीत सहभागी होणार होते. परंत. ऐनवेळी काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना वेळेवर निघता आले नाही. वारीची ओढ स्वस्थ बसू देईना, म्हणून त्यांनी दिंडी निघाल्यानंतर ३ दिवसांनी घरापासून एकट्यानेच पायी प्रवास सुरू केला. मंगळवारी टेंभुर्णीतून निघालेल्या शिंदे यांनी पहिल्या दिवशी ४० किलोमीटरचे अंतर कापत जालन्यात मुक्काम केला. आता ते दररोज २५ ते ३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत आहेत. या प्रवासाबाबत ते म्हणतात, “दिंडीत मी एकटा चालत असलो, तरी सदैव पांडुरंग सोबत असल्याचा भास होतो.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 4 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे