जालना येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब
ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड
घडली असून संपर्कप्रमुख सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच
जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव आणि महिला जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्या
उपस्थितीत रितेश खराडे, राजेश फुलझाडे, अजय करहाळे आणि गणेश दुधमोगरे
यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी
शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी वसीम शेख, यशवंत कायंदे, सुदाम
काळे, गिराम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.नव्या सहकार्यांच्या प्रवेशामुळे जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाची
संघटनात्मक ताकद निश्चितच वाढणार असून, आगामी काळात पक्षविस्तार आणि जनहिताच्या प्रश्नांवर अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त
करण्यात आला.