ब्रेकिंग
कै. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक शाळेत स्वसंरक्षणाचे धडे

0
4
0
5
4
5
जालना/दत्ता देशमुख,दि.27
कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयांमध्ये महिला व बालकल्याण विभाग तसेच बेटी बचाव बेटी पढाव यांच्या अंतर्गत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी प्रशिक्षक दत्ता पवार, वनिता पिंपरे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी स्वतःजवळ असलेले हेअर पिन,दप्तर, मोबाईल,पेन,, नखे, दात,याचा वापर करून स्वतःची सुरक्षा करू शकता असे सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती. मीनाक्षी कुलकर्णी, शिक्षक संदीप इंगोले, मदन सोजे,भीमाशंकर जवळेकर, प्रगती भालेकर, अलकनंदा गाडेकर,जगदीश डोईफोडे , राजाराम साबळे वंदना नन्नवरे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0
4
0
5
4
5

