जागतिक सायकल दिन’ निमित्त भव्य सायकल रॅली संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.3
जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, आर. परिविक्षाधीन रंगमंजू भा.प्र.से.,अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सर्व उपजिल्हांधिकारी मनिषा देशपांडे, मनिषा दांडगे, सुकेशीनी पगारे व तहसिलदार छाया पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस विभाग, एसआरपीएफ, माय भारत (My Bharat) उपक्रम, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), विविध सायकलिंग ग्रुप्स, व्यावसायिक, उद्योजक तसेच नागरिक मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी जिल्हायधिकारी आशिमा मित्तिल यांनी सायकलचे महत्वव, पर्यावरण व आरोग्यायच्याे दृष्टीजने महत्वन याअनुषंगाने उपस्थितांस मार्गदर्शन केले. सायकलचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक व निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील कैलास झोळगे यांनी आयर्नमॅन ही जागतिक स्तरावरील व्ही एतनाम येथे आयोजित अत्यंत कठीण व प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल श्रीमती मित्तल यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि आरोग्य वाढवा” हा संदेश देण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायकल रॅलीस जिल्हा्धिकारी आशिमा मित्तयल यांनी हिरवा झेंडा दाखवुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरुवात करुन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली सिव्हिल क्लब (आझाद मैदान) येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आरोग्य जनजागृतीसाठी रक्त तपासणी (Blood Check-up) शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला आरोग्य तपासणी शिबिरामुळे अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. सदर सायकल रॅलीचे वाहतूक नियोजन व सहभागींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने अत्यंत मोलाचे सहकार्य केले. रॅली दरम्यान वाहतुकीचे प्रभावी नियमन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि सुरक्षेची योग्य काळजी घेऊन पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वितेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व प्रशासकीय विभाग, विविध सायकलींग ग्रुप्स, इंडीयन मेडीकल असोसिएशन, व्या वसायिक, उद्योजक व उपस्थित नागरिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवेंद्र बारगजे यांनी केले.




