नांदेड जिल्हाधिकारी दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे का कार्यवाही झाली नाही याचे पंधरा दिवसात लेखी ऊतर द्या नाही तर स्व ईच्छारण्याची परवानगी साठी जिल्हाधिकारी दालनात धरने आंदोलनाचा ईशारा चंपतराव डाकोरे पाटील

नांदेड/प्रतिनिधी,दि.29
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाला न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी निवासी जिल्हाधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नांदेड यांची भेट घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड
मा. राऊत सरानी आठ बैठका, एक सुनावणी व आपण चार बैठका घेऊन आदेश, निर्देश,व इतिवृतातील एकाही प्रश्नाचे साधे ऊतर मिळत नसेल,आपले आदेश, निर्देश न पाळणाऱ्या कनिष्ठ अधिकारी यांना दप्तर दिरगांई कायदा, दिव्यांग कायदा लागू आहे काय? लागु असेल तर आपण काय कार्यवाही केली त्याची त्वरीत माहिती द्यावी.
१) दिव्यांगाच्या अनेक प्रश्नाबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी घेतलेल्या बैठकीतील इतिवृतातील किती प्रश्न सुटलात? किती प्रश्न का सुटले? किती सुटले नाहीत यांची लेखि माहिती पंधरा दिवसात द्या नसेल तर आपल्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत धरने आंदोलन करण्याचे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या शिष्टमंडळाने ईशारा जाने, फेब्रुवारी महिन्यात देऊन त्यांचे आठ महिन्यात साधे ऊतर मिळत नाही.
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी संबधित अधिकारी ऑफिस मध्ये भेटत नाहि. फोन केला तर उचलत नाहित, दिव्यांग बांधव उठत बसत चेकरा मारून वैतागून एक दिव्यांग लोहा तहसिल कार्यालयात दिव्यांगास आत्महत्या करण्याची वेळ आली. संघटनेच्या निवेदन स्व ईच्छा मरण्याची परवानगीचे निवेदन प्रत्यक्ष भेटुन त्या निवेदनाची साधे ऊतर मिळत नाही. यांचा अर्थ दिव्यांग आत्महत्या करावे अशी मुक संमती अधिकाऱ्याची आहे काय? वर्ष न वर्ष ते प्रश्न इतिवृतातील का सुटत नाही. आपल्याकडून सुटत नसेल तर त्यांचे लेखि ऊतर का मिळत नाहि. त्याबद्दल आपल्या कार्यालयाकडून दोषी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही का होत नाही?
मे. कर्तव्य दक्ष अधिकारी साहेब आपल्या समवेत संबधित अधिकारी, दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधी सोबत बारा बैठका एक सुनावणी तील इतिवृतातील किती प्रश्न सुटलेत व किती सुटलेच नाहि संबधित अधिकारी ऊतर दिले का नाहित ?यांची चौकशी त्वरित करून दोषावर योग्य ती कार्यवाही करा दिव्यांग हक्क द्या? नसेल तर स्व ईच्छा परवानगी साठी आपल्या दालनात पंधरा दिवसानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिला यावेळी आदित्य पाटिल, राजाभाऊ शेरकुरवार, मनोहरराव येरपुरवार, सुधाकर पिलगुंडे इत्यादी कार्यकर्त्यानी दिला.



