उपवर्गीकरणाविरोधात जाफ्राबादेत आंदोलन तीव्र; २७व्या दिवशी थाळीनादाने सरकारचे लक्ष वेधले

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करून संविधानिक आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला मंगळवारी (ता. १४) २७ दिवस पूर्ण झाले. शासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी थाळीनाद आंदोलन करून संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांन तहसील कार्यालयासमोर थाळ्या वाजवत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार मि साळ यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, अॅड. विनोद डिगे, चंद्रकांत चौतमल, प्रकाश राऊत, कौतिकराव राऊत, देविदास पैठणे, राजू साळवे, पिंटू मघाडे, गौतम म्हस्के, मिलिंद पारवे, उमेश सुतार, राजू गवई, राजू भिसे, मच्छिंद्र भिसे, विजय खरात, सर्जेराव हिवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. दरम्यान, बौद्ध समाज समन्वयक समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने रद्द करून संविधानिक आरक्षण कायम ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल, असा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला समस्त बौद्ध समाज घटानाद थाळीनाद आंदोलन



