pub-7425537887339079
ब्रेकिंग

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले ‘आपदा मित्र’ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रंगीत तालीमेदरम्यान पूर, अतिवृष्टी, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव, आपत्कालीन स्थलांतरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये फायबर बोट, इन्फ्लाटेबल रबर बोट, स्कुबा सेट, फायर जेल ब्लॅंकेट, लाईफबोये, बॅटरी कटर, बॅटरी स्प्रेडर, फ्लोटींग पंप, पोर्टेबल जनरेटर, पोर्टेबल पंप, मेगाफोन, सेफ्टी नेट, लाईफ जॅकेट व रिफ्लेक्टर जॅकेट आदी साहित्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा सुरक्षितरित्या बचाव कसा करावा, पूरस्थितीत रबर बोटीद्वारे नागरिकांचे स्थलांतरण कशा पद्धतीने करावे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या रंगीत तालीम व प्रशिक्षण उपक्रमांमुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांमध्ये समन्वय, तत्परता व कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे