जालना शहरात ‘भारतीय ज्ञान परंपरा व समृद्ध कीर्तन परंपरा’ याविषयी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 18
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० ऑगस्ट रोजी ‘भारतीय ज्ञान परंपरा व समृद्ध कीर्तन परंपरा’ या विषयावर श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय जालना येथे जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ अश्विन रांजणीकर, संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, छत्रपती संभाजीनगर हे असणार आहे तर उद्घाटक म्हणून ह भ प डॉ भगवान बाबा आनंदगडकर असणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री महेंद्र कुमारजी गुप्ता, अध्यक्ष श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालय समिती, जालना व संस्थेचे कोषाध्यक्ष श्री संजयजी अग्रवाल यांची उपस्थिती असणार आहे. या चर्चासत्राचे बीजभाषण हभप डॉ न ब कदम हे करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात हभप प्रा रामेश्वर नरवडे व संच यांच्या भजनाने होणार आहे तर सूत्रसंचालन हभप झगरे गुरूजी वाकदकर करतील.
दुपारच्या सत्रामध्ये ‘समृद्ध किर्तन परंपरेचा वर्तमान काळातील प्रभाव, उपयुक्तता व बदलते स्वरूप’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून या चर्चासत्राचे अध्यक्ष ह भ प डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर हे भूषवणार आहेत तर ह भ प डॉ प्रमोद महाराज कुमावत,हभप डॉ राम रौनेकर,हभप डॉ ऋषीबाबा शिंदे परिसंवादात आपले मनोगत मांडणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप हभप प्रशांत महाराज जाधव व हभप भक्तीताई रणनवरे यांच्या सुश्राव्य पसायदानाने होईल. या सत्राचे सूत्रसंचालन हभप नारायण महाराज पिंपळे हे करणार आहेत.
जालना जिल्ह्यातील निमंत्रित कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी व जिल्हातील मराठी विषयाचे प्राध्यापक या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत अशी माहिती श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ विद्या पटवारी, डॉ जितेंद्र अहिरराव, प्र. प्राचार्य, श्रीमती पार्वती देशमुख, डॉ स्वाती महाजन, डॉ वासुदेव उगले यांनी दिली आहे.

