
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.12
टेंभुर्णी पासून अवघ्या दोन किलोमीटर वरती गणेशपूर हे छोटेसे एक हजार वस्तीचे गाव.यात शेतकरी वर्ग जास्त आपल्या शेतीतून उत्पन्न काढत बरेच परिवार जगत आहे. येथे दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या परंतु उच्च शिक्षित असलेल्या दिनकर ला नोकरी साठी खूप संघर्ष करावा लागला आपल्या तुटपुंजी शेती करून आपला आणि आपल्या परिवाचे उदर निर्वाह करत त्यांनी आपल्या मुलीचा चांगले शिकवत तुला दहावीत पहिल्या येण्याचा मान मिळविले हे विशेष.नोकरी साठी खूप पर्यंत केले मात्र जाण्याची येण्याची अडचण मुळे तिथे ही जमले नाही. शेवटी हार न मानत दिनकर ने टेंभुर्णी येथे हिमतीनं वडेवाले आणि नाष्टा चे हॉटेल सुरवात करत एक चांगला संदेश दिला आहे. त्याच्या या विशेष प्रयत्नाला यश भेटावे म्हणून येथील व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचे विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलकेश सोमाणी मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव शेख नसीम गुरुजी माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय राऊत शेतकरी संतोष शिंदे शेख समद शंकर शेळके पोलिस पाटील मोतीराम अंधारे दिनकर चे वडील बालाजी अंधारे यांच्या सह व्यापारी शेतकरी उपस्थित होऊन दिनकर ला शुभेच्छा दिल्या.



