pub-7425537887339079
ब्रेकिंग

नवीन जालना भागातील रहिवाशांसाठी एसआरपीएफच्या आरक्षित जागेवर भव्य उद्यान व क्रीडांगण उभारण्याची नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांची मागणी

पालकमंत्री ना.पंकजाताई मुंढे व आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे मागणी !

0 5 1 5 0 6
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.4
  पालकमंत्री ना.पंकजाताई मुंढे या जालना
दौऱ्यावर आल्या असता नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी त्यांची
आ.खोतकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पालकमंत्री ना,पंकजाताई मुंढे व
स्थानीक आमदार अर्जुनराव खोतकर यांना जालना शहरातील नवीन जालना भागात
असलेल्या  एसआरपीएफच्या आरक्षित जागेवर भव्य उद्यान, नाट्यगृह व
क्रीडांगण यांची उभारणी करण्याची मागणी संपर्क प्रमुख भास्करराव अंबेकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, माजी जि.प.स्ध्यक्ष अनिरुद्ध
खोतकर, पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, युवा नेते अभिमन्यू
खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, पालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश खरे,
नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले आदींची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री ना.पंकजाताई मुंढे व आमदार अर्जुनराव खोतकर यांना
दिलेल्या निवेदनात नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी म्हटले आहे की, जालना
शहराची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. नगरपालिकेतून
महानगरपालिकेत रुपांतर झालेल्या या शहरात एकच उद्यान आहे.
भौगोलिकदृष्ट्या जालना शहर हे अर्धे नवीन जालना व अर्धे जुना जालना असे
दोन भागात विभागलेले आहे. नवीन जालना भागात अडीच लाखांपेक्षा अधिक
लोकसंख्या आहे व मोठे खेळाचे मैदान नाही. महानगरपालिकेने विकास आराखड्यात
नवीन जालन्यात SRPF च्या दीडशे एकरहून अधिक असलेल्या जागेपैकी २० एकर
जागेवर उद्यान व खेळाचे मैदान प्रस्तावित केलेले आहे. शहरालगत असलेल्या
मंठा चौफुली या भागातील जागेत संबंधित आरक्षण विकसित करून तेथे एक मोठे
उद्यान, जलतरण तलाव, १२०० आसन क्षमतेचे भव्य नाट्यगृह-सभागृह व मोठे
खेळाचे मैदान इ. सुविधा उभारण्यासाठी महानगरपालिकेला ५० कोटींचे विशेष
अनुदान देण्यात यावे.
सदरील महानगरपालिकेने उद्यान व इतर सुविधा विकसित केल्यावर
देखभाल-दुरुस्तीसाठी SRPF कडेच हस्तांतर करून शहरातील नागरिकांसाठी ते
खुले ठेवावे. जेणेकरून जालना शहराच्या वैभवात भर पडेल व नागरिकांना या
सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. देखभाल दुरुस्ती SRPF कडे राहत असल्यामुळे
व नाममात्र  दरात नागरिकांना प्रवेशिका लावल्यास निश्चित स्वरूपाचे
उत्पन्नही मिळेल. करिता जालना शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या
सुविधेसाठी आपण ५० कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून महानगरपालिकेला
द्यावा अशी विनंतीही नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी केली.
यापूर्वीही त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत मागणी करून
उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आमदार लोकप्रतिनिधी अशा विविध स्तरावर ते
सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. उद्यान, क्रीडांगण व इतर विकास कामांचा
त्यांनी स्वखर्चाने पुणे येथून आराखडा तयार करून घेतला असून ना.पंकजाताई
मुंढे यांनी सदरील आराखडा पाहून मंत्रालय स्तरावर यासंदर्भात नगरविकास व
गृह विभागाची बैठक घेण्यात येईल असा शब्द दिला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 5 0 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे