pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दत्त जिनिंगजवळ उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याजवळ पूजा-अर्चना व आरती करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच होळकर जयंती उत्सव समि तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन झोरे, राजू करवंदे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलकेश सोमाणी, मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव शेख नसीम, संजय राऊत, प्रदीप म घाडे, राजू खोत, पवन झोरे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. तसेच उत्सव समितीचे प्रमुख अनिल शेजूळ यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. संध्याकाळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे