pub-7425537887339079
ब्रेकिंग

पंढरपूर सायकल वारी यशस्वी डॉ पंडित सुरशे यांचा सत्कार

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर टेंभुर्णी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या सायकल वारकऱ्यांनी आपली भक्तीमय वारी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ‘भोकरदन-जाफ्राबाद रनर्स’चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध मॅरेथॉनपटू पंडित सुरशे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या सायकल वारीचे टेंभुर्णी आणि संपूर्ण परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेऊन सर्व सायकलपटू सुखरूपपणे आपल्या गृहनगरीत परतले आहेत. टेंभुर्णी परिसरातील सायकल प्रेमी आणि विठ्ठल भक्तांनी एकत्र येत या विशेष ‘सायकल वारी’चे आयोजन केले होते. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” चा जयघोष करत या वारकऱ्यांनी टेंभुर्णी ते पंढरपूर हे शेकडो किलोमीटरचे अंतर सायकलने पार केले. पोहोचल्यानंतर सर्व सायकल विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन घेतले. विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीची यशस्वी सांगता केल्यानंतर सुखरूपपणे गावी परतले. टेंभुर्णी शहरात आगमन होताच स्थानिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पंडित सुरशे यांचा सत्कार करण्यात आला *चौकट* “सायकल चालवल्यामुळे आरोग्याचा संदेश मिळतो आणि प्रदूषणही टाळता येते. विठ्ठलाच्या भक्तीच्या ताकदीमुळे आणि सर्व सहकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही हा कठीण प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय आनंदाने पूर्ण करू शकलो सायकल वारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना सायकलिंग, धावणे (रनिंग) आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व कळावे, हा मुख्य उद्देश होता. या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरातून सायकल भक्तांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ पंडित सुरशे सायकलिस्ट टेंभुर्णी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे